तळेगाव दाभाडे:-कोरोना महामारीच्या विरोधात राज्यस्तरीय सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी.अशी मागणी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देण्यात यावे.तसेच सर्व पक्षातील अभ्यासू व वेळ देऊ शकणाऱ्या नेत्यांना या समितीत घेण्यात यावे.राज्यातील जनतेसाठी वयं पंचाधिकं शतम् या उक्तीप्रमाणे या महामारीचा मुकाबला करण्यात यावा.
वरील आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे, विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांना ई-मेल व ट्विटरद्वारे पाठवले आले.
0 टिप्पण्या