Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणा संदर्भात झालेल्या निर्णयाचा निषेद म्हणुन पवनानगर येत भारतीय जनता पार्टीचे मुंडण आंदोलन


मराठा आरक्षणा संदर्भात 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याचा निर्णय जाहिर केला. त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट, राज्य शासनाचा मराठा समाज्याच्या विविध स्थरातुन निषेद नोंदवला जात आहे. मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहेत. पवनमावळ मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतिने मुंडण आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात अनेक मराठा बांधव भर उन्हात रस्तावर बसुन मुंडण करताना दिसत आहेत. या आंदोलनात सरकार विरुद्धचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. 

मराठा आरक्षणा बाबत अनेक वर्ष मराठा समाज झगडत आहे. अनेकांचे बलिदान झाले. लाखोंचे मोर्चे निघाले परंतु मराठा समाज्याला न्याय मिळाला नाही. प्रत्येक वेळी काहीना काही कारण काढुन मराठा समाज्याला डावलण्याचा प्रयत्न केला गेला. राज्य सरकार मराठा समाज्याची बाजु मांडण्यात कमी पडल. गोर गरीब मराठ्यांची पोर परिक्षेत मेरीट मध्ये असताना देखील आरक्षणा अभावी बेरोजगार झाले. मराठा समाज हा अन्याय कदापी सहन करणार नाही. वेळो वेळी मराठा समाज सडेतोड उत्तर देईल असे भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री किरण राक्षे म्हणाले. 

या वेळी बोलत असताना भाजपा पवन मावळ अध्यक्ष धनंजय टिळे यांनी कडक शब्दात राज्यसरकारचा निषेद व्यक्त केला तर युवा संघटन मंत्री गणेश ठाकर यांनी आरक्षणा अभावी मराठा तरुणांची दयणीय अवस्ता व्यक्त केली. 

या ठिकाणी किरण राक्षे, गणेश ठाकर, धनंजय टिळे, किसनराव खैरे, शंकराव लोखंडे, विकास दहिभाते, गणपत शिंदे, बाळासाहेब खांडभोर, गणेश साबळे , शामराव येवले, सुरेश आडकर, प्रशांत लगड, सनी ठोंबरे, गणेश घारे, सिद्धी दळवी व इतर मराठा बांधव उपस्थित होते.