पवनानगर -पवन मावळ मधिल राजेवाडी गावातील शिवराम सदु राजीवडे यांच्या कुटुंबातुन महेंद्र राजीवडे यांचा फोन किरणभाऊंना सोमवार दिनांक 19 एप्रील ला आला. भाऊ आमच्या कुटुंबात शिवराम राजीवडे व त्यांच्या पत्नी यशोदा राजीवडे ह्या कोरोणा बाधीत आहेत. त्यांना उद्या सकाळी बेड उपलब्ध होईल का ? भाऊंनी पेशंटच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी केली व व्यवस्था करु अस आश्वासन दिले. 20 एप्रील रोजी सकाळी 8 वा. ठरल्या प्रमाणे किरणभाऊ राजेवाडी गावात पोहचले. पोहचल्यावर कळले की आजोबा शिवराम राजीवडे यांच कोरोणाने रात्रीच निधन झाले. आजीलाही कोराणाची लागण आहे. आजीला त्रास होतोय. आजोबा तर गेले, आजीला आपण वाचवु शकतो परंतु गावातील कोणीही आजीच्या जवळ जायला तयार नव्हते. सर्वच कोरोणाला घाबरत होते कसलाही विचार न करता जनसेवक किरणभाऊ राक्षेंनी स्वतः आजीला उचलले आणी स्वताच्या गाडीत घेवुन दवाखान्यात निघाले. गावातील ग्रामस्त भाऊंच धाडस पाहुंन अचंबीत राहिले.
भाऊंनी जाता जाता गाडीतुनच पवना नगर ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख इंद्रनील पाटिल यांना संपर्क केला. त्यांनी कान्हे येथे बेड उपलब्ध होईल अस सांगीतले लगेच सभापति नितिन दादा घोटकुले व तालुका आरोग्य आधीकारी लोहारे सर यांच्याशी बोलन करुन बेड उपलब्ध झाला . तसेच आढले प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करुन त्यांना तात्काळ राजेवाडी ग्रामस्थांची तपासणी करण्यास सांगीतले त्यांनी लगेच राजेवाडीला भेट देवुन ग्रामस्तांची तपासणी केली.
आजीला दवाखान्यात आणलं गेलं. उपचार सुरु झाले. उपचारा नंतर आजीची प्रकृती सुधारु लागली 13 दिवसानंतर आजी ठणठणीत बरी होऊन घरी परतली. कोरोणाला घाबरुन जीव गमावणार्या तरुणाई पुढे आजीने नविन आदर्श ठेवला.
1 मे रोजी घरी परतल्या नंतर आजीला कळालं आज आपल्या पतीचा तेरावा आहे. आजी दुःखाने व्याकुळ झाली मुला मुलींनी आधार दिला. आजी बरी होऊन घरी परतली हे कळताच किरणभाऊंनी कुटुंबाला पुन्हा भेट देवुन आस्थेने चौकशी केली. चोकशी करत असताना कुटुंबातील सदस्यांनी विचार करायला लावणारी परिस्थीती सांगीतली.
आजी आजोबा आपल्या मुलाकडे हिंजवडीत राहात होते. मुलाला कोरोणाची लागण झाली त्या पाठोपाठ सुनही कोरोणा पॉझीटिव्ह निघाली दोघेही हॉस्पीटल ला घरी आजी आजोबा नातवंड, दोन दिवसा नंतर आजोबा आजींची टेस्ट ही कोरोणा पॉझिटीव्ह बेड उपलब्ध नाही 7 दिवस कोरोणा असताना काही न खाता घरात बसुन काढावे लागले. घर मालकाला कळाल त्याने कोरोणा पेशंट घरात ठेवल्या मुळे तात्काळ रुम सोडण्यास सांगीतल काय कराव सुचेना म्हणुन घरातील मंडळींनी गावी राजेवाडीला आणण्याच ठरवल. गावातही कुजबुज सुरु झाली परंतु इलाज नवता घरी होम कॉरंटाईन करण्याच ठरल . महेंद्र राजीवडे यांनी पुन्हा तपासण्या करुन घेतल्या परस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता किरण भाऊ राक्षेंना बेड साठी विनंती केली. सकाळी बेड उपलब्ध होईल हे ठरल परंतु काळाने घात केला रात्री शिवराम राजीवडे आजोंबाचे कोरोणाने निधन झाले. सकाळी आजींना किरणभाऊंनी दवाखाण्यात नेले आजी बरी झाली.
संवाद साधत असताना आजीच्या मुली वंदना , सुवर्णा यांनी डोळ्यातील आसवे टिपत आमच्या आईला वाचवण्या साठी तुम्ही पांडुरंगाच्या रुपी आलात भाऊ ! असे कृतज्ञतेचे उदगार काढले. किरणभाऊ म्हणाले माझी स्वताची आजी असती तर मी तीला अस वार्यावर सोडल असत का ? माझी आजी समजुनच मी आजीला घेवुन गेलो स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसर्यांसाठी जगणारं जनसेवक किरण भाऊंच व्यक्तित्व निराळच.
या वेळी त्यांची मुल गणपत, रामदास, मुली, सुना, नातवंड तेजस, सिद्देश , तसेच महेंद्र राजीवडे, प्रकाश राजीवडे, निखिल राजीवडे उपस्थित होते.