Ticker

6/recent/ticker-posts

Vadgaon - वडगाव न्यायालयात महिला न्यायाधीशास लाच घेतल्या प्रकरणी अटक..


अर्चना दीपक जतकर असे अटक केलेल्या महिला न्यायाधीश यांचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलिस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव यांना अटक केली होती. तर लाच घेताना प्रथम खाजगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती, त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार गुरुवारी एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकर यांना अटक केली आहे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस नाईक नवनाथ माळी, कर्मचारी सुप्रिया कादबाने, पूजा पागिरे, अविनाश इंगुळकर यांच्या पथकाने केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या