तळेगाव दाभाडे:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध तसेच विकेंड लॉक डाऊन जाहीर केला आहे.सरकारने १मे पर्यत कलम १४४ लागू केले असून संचार बंदी करण्यात आली आहे.ह्या संचारबंदी मुळे मोल-मजुरी करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला आहे.रोजगारा अभावी त्याची इतर अनेक गैरसोय होत आहे.
तळेगाव दाभाडे मधे भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर वतीने हिंदुस्थानच्या अस्मितेचे व राष्ट्रीय चैतनेचे प्रमुख प्रभू श्री राम नवमी चे औचित्य साधून "नमो थाळी" चे उद्घाटण आज साय ७ वाजता मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या कार्यालयासमोर व जिजामाता चौक येथे होणार आहे .
खर्या अर्थाने ही तळेगाव मधील गोरगरिबांची भुक भागवणार आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची हॉटेल बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक भावनेतून अल्प दरात "नमो थाळी" ची सोय केली आहे.हि थाळी नागरिकांना फक्त ५ रुपये किंमतीमध्ये उपलब्ध केली आहे.
-----------------------------
वसुंधरा न्युज मावळ
-----------------------------
0 टिप्पण्या