Ticker

6/recent/ticker-posts

Mumbai-"ते" रेमडेसिवीर राज्यसरकारलाच मिळणार होत अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा राज्यसरकारला घरचा आहेर ...

“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठीच रेमडेसेवीर इंजेक्शन्स आणली होती.” अशी कबुली, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या कबुलीनंतर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट्स करून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना लक्ष्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ‘आभारही’ मानले आहेत.
     
            विषय आसा कि ब्रुक फार्मा या औषध उत्पादक कंपनीच्या राजेश जैन यांना शनिवारी रात्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलीसांनी ताब्यात घेतले. दहा पोलीस अधिकारी हे रात्री त्यांच्या घरी गेले आणि त्यांना ताब्यात घेतले गेले. यावेळी ताब्यात घेण्याचे कोणतेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. ही बातमी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले. पोलीसांना ह्या संपूर्ण घडल्या प्रकाराविषयी जाब विचारला असता पोलीसांकडून, “अटक केली नसून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते” असे सांगण्यात आले. “आमच्याकडे अशी माहिती होती की काही निर्यातदारांकडे रेमडेसिवीरचा ६०,००० वायल्सचा साठा उपलब्ध आहे आणि या माहितीच्या आधारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले.” असे पोलिसांचे म्हणणे होते. पण पोलीसांकडे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नव्हती. अन्न आणि औषध विभागाकडून त्यांना एक पत्र मिळाले होते. पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती असे पोलीसांकडून सांगण्यात आले होते. आता या बाब FDA मंत्रालयानेच  या बाबत स्पष्टीकरण दिलेने मंत्री नवाब मलिक हे तोंडघसी पडले आहे .
----------------------------- 
वसुंधरा न्युज 
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या