पुणे ग्रामिण - कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येनं लोकांना संक्रमण झालं आहे. मुंबई, पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पडत आहे. नातेवाईकांना रेमडेसिविर देण्यासाठी लोकांना मेडिकलच्या बाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. तसंच रेमडेसिविरचा काळा बाजार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडेसीवर इंजेक्शन, तोसिलिझुमाब इंजेक्शन व ऑक्सिजन यांची कमतरता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक हैराण झाले असून प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
याबाबतीत पुणे जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांनी काही मागण्या व सूचना निवेदन पत्र निवासी उपजिल्हाधिकारी सौ जयश्री कटारे मॅडम यांना दिले. व त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
0 टिप्पण्या