लोणावळा - लोणावळा शहरांमध्ये करोणा पेशंटचे प्रमाण वाढत चालले असून त्यांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन बॅड उपलब्ध होत नाही.
लोणावळा शहरांमध्ये लोकसंख्याही सत्तर हजारांच्यावर असल्याने तिथे अत्यावश्यक सुविधा पोहचवण्यास नगरपालिकेस अडचण निर्माण होत आहे. यासाठी नवीन कोवीड सेंटर उभारण्याचे मागणीही यावेळी युवा मोर्चा यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
लोणावळा मोठे शहर असल्याने व कायम स्वरूपी सीईओ नसल्याने अधिक कामाचा भार हा नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्या वरती येत आहे. युवा मोर्चा लोणावळा यांनी मागणी केली आहे की आम्हाला कायमस्वरुपी सीईओ मिळावा व लोणावळा शहरांमध्ये नवीन व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे अशी मागणी केली आहे .विद्यमान आमदार हे संजीवनी हॉस्पिटलमध्ये आले परंतु शेजारी असलेल्या कोवीड सेंटरला आले नाही.या बाबत तेथील कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, महिला आघाडी अध्यक्ष योगिता कोकरे ,श्रवण चिकणे, संकेत निकुडे,बाबू संपत ,नंदू जोशी ,यश वाळंज विजय सकट ,सचिन ऊंबरदंडे, स्नेहा पालकर, दीक्षा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
0 टिप्पण्या