Ticker

6/recent/ticker-posts

PUNE-पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद...

 PUNE : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. पुण्यात प्रशासकीय बैठक घेण्यात आली होती. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात सर्व ग्रामपंचायती, नगर परिषद, छावणी हद्दीत दिनांक ३/४/२०२१ पासून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास (जमाबंदी) प्रतिबंध करण्यात येत आहे .सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस रक्कम रुपये 1000 रुपये (प्रति व्यक्ती )  दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 

दूध भाजीपाला फळे पुरवठा करणारे वृत्तपत्र सेवा व  आवश्यक सेवा पुरवणारे आस्थापना ,कोविड लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना यातून वगळण्यात आलेले आहे.सर्व हॉटेल,बार,रेस्टॉरंट ,नाट्यगृह,,सिनेमाहॉल,व्यायामशाळा इतर पुढील ७ दिवस / आदेश येईल पर्यत बंद राहतील.

 लग्न समारंभात ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व अंत्यसंस्कर ,दशक्रीया विधी साठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सामाजिक ,राजकीय ,धार्मिक ,भुमिपुजन ,उद्धाटन असे सर्व कार्यक्रम प्रतिबंध राहतील.

     सर्वप्रथमिक ,माध्यमिक ,महाविद्यालय,यांचे नियमित वर्ग ३० एप्रिल २०२१ पर्यत बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण वर्ग चालु राहतील.

             सोबतच पुण्याची  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली PMPMLची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असतील.  मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. हे सगळे निर्बंध उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की, संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
----------------------------- 
वसुंधरा न्युज 
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या