Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet - कामशेत मधे कानिफनाथ महाराज उत्सव साध्यापणाने साजरा...


कामशेत - कामशेत मध्ये कानिफनाथ महाराज उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. आज फाल्गुन शुद्ध पंचमी या दिवशी कानिफनाथ महाराज यांनी समाधी घेतली.

             आजच्या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्त कामशेत  गावठाण मधिल कानिफनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात ढोल, ताशा वाद्यांच्या अशा गजरामध्ये मिरवणूक काढली जाते परंतु यावेळी करोना साथीचे सावट असल्याने कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मोजक्या लोकांमध्ये श्री चा अभिषेक ,पूजन ,आरती आणि महाराजांची गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली. या वेळी कानिफनाथ भक्त भरत शिनगारे, पोलीस पाटील रोहिदास शिंदे, दत्ता शिंदे यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         कार्यक्रमाचे आयोजन कै. भरत शिनगारे शिंनगारे यांचे भक्त गण तसेच ग्रामस्त यांच्या कडून करण्यात आले.
----------------------------- 
वसुंधरा न्युज 
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या