सोमाटणे -भारतीय जनता युवा मोर्चा, क्रीडा आघाडी , विद्यार्थी आघाडी,सोशल मीडिया आघाडी आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चषक २०२१ चे आयोजन पुसाणे गावामध्ये करण्यात आले होते.
६ एप्रिल भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस "एक देश मे दो निशान दो विधान दोन प्रधान नही होंगे" असा नारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिला होता.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय राजकारणात हिंदू राष्ट्रवाद विचारसरणीच्या प्रवर्तकापैकी एक मानले जातात. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी "जनसंघ" या राजकीय पक्षाची स्थापना केली.त्या पक्षाचेच पुढे ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष असे नामकरण झाले.भाजपच्या ४१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे तसेच कार्याध्यक्ष पुणे जिल्हा बाळासाहेब घोटकुले यांच्या वतीने क्रिकेट मॅच सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संघटनमंत्री किरण राक्षे,मा.सरपंच सुनील राक्षे, नितीनदादा घोटकुले,गणेश ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, कार्याध्यक्ष अर्जुन पठारे,यादव सोरटे, रामभाऊ गोपाळे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, तळेगाव युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भेगडे,गणेश सावंत,विक्रम वाजे,करण गोणते,विकी म्हाळसकर आदी कार्यकर्ते सहभागी होते.
-----------------------------
वसुंधरा न्युज मावळ
-----------------------------
0 टिप्पण्या