माऊलीनगर (कामशेत) मधील रामनवमी उत्सव रद्द
कामशेत- कामशेत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे तो रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व आदेशान्वये कामशेत, (खडकाळे) मावलीनगर येथे बुधवार दि.२१ रोजी होणार्या राम नवमी ऊत्सवा बाबत श्री राम मंदीर ट्रस्ट वतीने सर्व नागरिकांना सुचना करण्यात आल्या आहेत कि, माऊलीनगर कामशेत मधील श्रीराम नवमी उत्सव रद्द करण्यात आला असुन, सदरील उत्सवाच्या कालावधीत भाविक व नागरिकांनी श्रीराम मंदिरात व मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये असे अवाहन श्री राम मंदिर माऊलीनगर ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------
वसुंधरा न्युज मावळ
--------------------
-------------------------------
0 टिप्पण्या