Ticker

6/recent/ticker-posts

Maval- सांगवडे गाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण..




 मावळ : सांगवडे गावात मागील काही दिवसांपासून अन्न पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा वावर दिसून आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा बिबटया गावातील श्वानांची शिकार करत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


सोमवारी सकाळी ग्रामस्थ संजय लिमण यांच्या उसाच्या शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. तेव्हा गावातील श्वान गायब होण्याचे कारण शेतकऱ्यांना समजले. शेतकऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायतीस सांगितले असता ग्रामपंचायतीने तातडीने याची माहिती वनविभागास दिली. 


               घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी सांगवडे परिसराची पाहणी केली असुन रात्रीची गस्त सुरू केली आहे. अद्याप बिबट्याचा वावराचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही. याबाबत कोणताही पुरावा मिळाल्यास ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधावा असे वनपरीक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी सांगितले. 

कासारसाई, पंचक्रोशी मधे उसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथे उन्हाळ्यात अनेकदा बिबट्या अन्न पाण्याचा शोधात येत असतात अशाच प्रकारे हा बिबट्या देखील सांगवडे परिसरात आला असल्याचे  नागरीकांनी काळजी घ्यावी असे सांगवडेचे सरपंच रोहन जगताप ,उपसरपंच योगेश राक्षे  यांनी सांगितले.

----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या