कार्यक्रमाचे उदघाटन ग्रामपंचायत खड़काळे विद्यमान सदस्या सौ. मोनालीताई रूपेश गायकवाड़ यांच्या हस्ते झाले प्रसंगी गौतमभाऊ निकाळजे,संतोषभाऊ कदम,अभिमन्यु ओव्हाळ,सुनील गायकवाड़,अशोक केदारी,संजय वाघमारे,किसन आहिरे, राजेंद्र शिंदे,रूपेश (सोनु) गायकवाड़ व सर्व युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवुन मास्क लावून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.रक्तदान शिबिरामध्ये गरवारे ब्लड बैंक व जनरल हॉस्पिटल तळेगाव यांना ५३ तरुणांनी आपले रक्तदान करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर याना खऱ्या अर्थाने अभिवादन करून जयंती साजरी केली.राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना तरुणांनी केलेलं रक्तदान खरंच कौतुकास्पद आहे.
..............................
0 टिप्पण्या