Ticker

6/recent/ticker-posts

maval-मावळ तालुक्यातील ऊर्से येथील श्रीनिवास लॉजिस्टिकच्या प्रमुख मंजूश्री धामणकर यांना नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात ‘बिजनेस अॅवॉर्ड’ने सन्मानित ...

बेबडओहोळ, ता.६ :मावळ तालुक्यातील ऊर्से येथील श्रीनिवास लॉजिस्टिकच्या प्रमुख मंजूश्री धामणकर यांना नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात ‘बिजनेस अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.लॅजिस्टीक ऊद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

झिंबाब्वेचे अॅम्बेसिडर गाॅडफ्रे मेजनोचिफरे यांच्या हस्ते धामणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.धामणकर यांच्यासह देशाच्या विकासात व उद्योग क्षेत्रात मह्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २० मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

मंजूश्री धामणकर यांनी आपल्या भाषणात या पुरस्काराबद्दल ‘ग्लोबल इंडिया बिजनिस सिरमचेे आभार व्यक्त केले. ‘पुरस्कार निवड समिती आणि सल्लागार मंडळाने केलेल्या या सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. समाजात दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी आणि या बदलाची परंपरा निर्माण करण्यासाठी, तसेच समाजाच्या वंचित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसाय हा अतिशय प्रभावी मार्ग आहे,’ अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमास केन्द्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले,ग्लोबल इंडिया बिजनिसचे प्रमुख जितेंद्र जोशी, इक्वाडर आॅफ इंडियाचे अॅम्बेसिडर हेक्टर क्वेवाजाकम,राॅजर गोपाळ,नायजेरीयाचे उच्च मंञी इस्माईल अयो अलाटिस, योगेश दुबे व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या