Ticker

6/recent/ticker-posts

Maval-थोर समाज सेवक ,स्वातंत्र्यसैनिक कै.नथुभाऊ भेगडेपाटील यांच्या पवित्र पावन १७ वी पुण्यतिथी दिनी निमित्त स्मृतींस उजाळा.

मावळ - तळेगाव दाभाडे येथीत थोर समाज सेवक स्वतंत्रसैनिक कै.नथुभाऊ भेगडेपाटील  आदरणीय स्वयंसेवकाने आद्य सरसंघचालक प.पु. डॉ हेडगेवार व प.पु. गोळवलकर गुरुजींच्या पथदर्शनातून समाजात जागृती निर्माण केली. संघ संस्कारातून बुद्धी, मन, चित्त आणि व्यायामाने शरीर कणखर, निरोगी बनवलं. आरोग्यसंपन्न, शक्तीशाली देहामध्ये निरोगी मन राहू शकतं. असंच मन संयमी, सोशिक होऊन समाजाची सेवा करू शकतं. सावध, साक्षेपी वृत्तीनं समाजाला घडवू शकतं हे तसं जगून वागून सिद्ध केलं. 
              
           देश हा देव असे माझा या परिपक्व धारणेतून देशातील इंग्रज, पोर्तुगीज जुलुमी राजवटी विरिद्ध असंख्य सोबती जमवून यशस्वी लढा दिला. सुखांचा, सुविधांचा आणि स्वार्थाचा सहजपणाने त्याग करून समाजोद्धारासाठी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा निरपेक्ष परंतु अमिट ठसा उमटवला. धन, पद, प्रतिष्ठा, अधिकार या कशाचाही संग्रह न करता अलिप्तपणे मी एक सेवक या भूमिकेत आजन्म कार्यव्रत अवलंबिल  पुजनिय कै. नथुभाऊ बा. भेगडे पाटील.
समाजाला अशाच गुणवान, धैर्यवान सेवकांची फार फार आवश्यकता आहे. स्वतःच्या आचरणातून समाजाला समजेल अशा आदर्श पद्धतीने जीवन जगायला शिकवणारे असे स्वयंसेवक महान आहेत. त्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींमुळेच समाज खऱ्या अर्थाने उभा आहे. स्वयंसेवकाच्या अशा पूर्ण भूमिकेत स्वतःचे व समाजाचे जिवन उन्नत करून उजळविणाऱ्या दिपस्तंभांचे अनुसरण हीच ईश्वरसेवा आहे. हा ईश्वर सेवेचा वारसा आम्हाला अविरत चालवायचा संदेश त्यांनी तरुणांना दिला आहे.हेच भाऊचे व्रत नातु संतोष भेगडेपाटील हे  विश्व हिंदू परिषद बजरंगदल ,छत्रपती शिवशंभु  स्मारक समिती मार्फत मावळ तालुक्यातील  दुर्गम भागातील  कातकरी ,ठाकर,कोळीमहादेव अशा डोंगरी भागातील रहीवासी यांची आहोरात्र सेवा करीत आहेत.

आज थोर समाज सेवक स्वतंत्रसैनिक कै.नथुभाऊ भेगडेपाटील पवित्र पावन १७ वी स्मृतींस त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या