Ticker

6/recent/ticker-posts

Maval-भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या कडुन मावळ मधील कोविड सेंटरला फवारणी,हॉट यंत्र,हायपोक्लाराइड,सॕनिटायझर भेट

मावळ तालुका भारतीय जनता  पक्षाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी इंदोरी येथील कोविड सेंटर तोलानी इन्स्टिट्यूट आणि समुद्र कॉलेज टाकवे या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. 
याठिकाणी सेवा बजावत असणारे डॉ. मिलिंद सोनवणे,तोलानी सेंटरच्या डॉ. पानसरे व नर्सेस यांच्याशी संवाद साधला. त्यांना असलेल्या अडचणीसंदर्भात  संदर्भात सविस्तर चर्चा केली.
या दोन्ही ठिकाणी आवश्यक असणारे सॅनिटीझर फवारणी करण्यासाठी फवारणी यंत्र , हायपोक्लाराईड, सॅनिटायझर तसेच हॉट वॉटर चे मशीन देखील देण्यात आले. 
त्यावेळी सरचिटणीस सुनील चव्हाण,युवा नेते देवा भाऊ गायकवाड,पंचायत समिती सदस्य ज्योती शिंदे,इंदोरी शहर युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नाटक,भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे,नवनाथ पानसरे यावेळी उपस्थित होते.
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या