मावळ - मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांची कोरोना रॅपिडटेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकीचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने ते गेल्या काही दिवस पंढरपूरमध्ये तळ ठोकून होते.दि.१५ रोजी प्रचाराची सांगता करून ते आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते.त्याना थकवा जाणवू लागल्याने त्यानी कोरोनाची चाचणी केली होती त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाळा भेगडे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजताच त्याच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.
पंढरपूर दौऱ्यानंतर थकवा जाणवत असल्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या च्या सल्ल्याने मी घरीच उपचार घेत असून चिंता करण्याचे कारण नाही.माझ्या संपर्कात आलेल्याना विनंती आहे की आपण हि आवश्यक ती काळजी घ्यावी.:- बाळा भेगडे
0 टिप्पण्या