तळेगाव दाभाडे:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध तसेच विकेंड लॉक डाऊन जाहीर केला आहे.सरकारने १मे पर्यत कलम १४४ लागू केले असून संचार बंदी करण्यात आली आहे.ह्या संचारबंदी मुळे मोल-मजुरी करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला आहे.रोजगारा अभावी त्याची इतर अनेक गैरसोय होत आहे.
तळेगाव दाभाडे येथील उद्योजक,जनसेवा विकास सेवा समितीचे अध्यक्ष किशोर आवारे आणि त्याच्या सहकार्यानी मिळून हातावर पोट असलेल्या नागरिकांची,तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची हॉटेल बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक भावनेतून अल्प दरात "जनसेवा थाळी" ची सोय केली आहे.हि थाळी नागरिकांना फक्त ५ रुपये किंमतीमध्ये उपलब्ध केली आहे.सामाजिक भावनेतून किशोर आवारे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
0 टिप्पण्या