Ticker

6/recent/ticker-posts

सर्वे भवन्तुं सुखिनः..लोकप्रतिनिधी असावा तर असा..

लोकप्रतिनिधी असावा तर असा..
कार्ला - करोना साथीच्या काळात आज कोरोना बाधीत पेसेंन्ट जवळ जायलाही घाबरत असताना लोकप्रतिनिधी देवा सारखा धावत येऊन एका भगीनीस स्वताःच्या जीवाची पर्वा न करता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

              गावातील तरुणाचा  फोन आला एक करोना पिडीत कुटुंब अडचणीत आहे त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कोरोना ची बाधा झालेली आहे घरातील इतर व्यक्ती हॉस्पिटल मध्ये आहे परंतु त्यांची पत्नी सुद्धा घरी आजारी आहे ती सुद्धा पॉझिटिव असण्याची शक्यता आहे त्यांना मदतीची गरज आहे, तुम्ही त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ शकता का ?
अमोलभाऊ भेगडे  आणि नवनाथ भाऊ कोंडभर यांनी कुठलाही विचार न करता स्वतःच्या गाडीमध्ये त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला दवाखान्यांमध्ये नेऊन सर्व प्रकारची टेस्ट केली व त्यांना धीर दिला अजून कुठल्या प्रकारची मदत लागली तर आम्हाला कधीही फोन करा असे सांगितले. अशा प्रकारची मदत करून भाऊंनी त्या कुटुंबासाठी पुढे येऊन जे धाडस दाखवले ते सर्वांनी दाखवावे अशा परिस्थितीत सख्खा भाऊ  कामाला येत नाही असे बोलून त्या पीडित व्यक्तीने भाऊ चे आभार मानले.

 आपण आपल्या आजूबाजूला शेजारी गावातील आपल्या भागातील अशा गरजू कुटुंबांना आपल्याला शक्य होईल अशी मदत करावी - अमोल भेगडे

----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या