Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकर्त्यांनी घरावर झेंडेलाऊन केला भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा...



कामशेत- भारतीय जनता पक्ष ४१ व्या वर्धापनदिन मावळ तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

               वडगाव पक्ष कार्यालय मध्ये ही अगदी साध्या पद्धतीने साजरा केला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपा पक्षाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वेळी जिल्हा अध्यक्ष  गणेश भेगडे,प्रभारी भास्कर आप्पा म्हाळस्कर यांनी भारतीय जनता पक्षाचा इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडला ,वर्धापन दिवस हा तळेगाव, लोणावळा, देहूरोड ,कामशेत इतर ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी भारतीय जनता पक्षाचा झेंडा घरावर लावून साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला.

भारतीय जनता पक्ष एक अंतोदय,एकात्ममानववाद ही विचार धारा आहे, कार्यकर्यानी याचा अंगीकार केला पाहीजे - शंकरनाना शिंदे ,भाजपा नेते कामशेत 
----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या