Ticker

6/recent/ticker-posts

पांडुरंग-दामाजी परिवाराच्या मदतीला संत तुकाराम महाराज परिवार...


पंढरपूर:-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा सोलापूर प्रभारी,मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्याकडे आहे.निवडणूकीचा प्रचार चालू झाल्यापासून बाळा भेगडे हे मतदार संघात आपला तळ ठोकून आहेत.मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठका,गाठीभेटी ते घेत आहे.

      बाळा भेगडे यांच्या बरोबरच त्याची मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची टिम येथे दाखल असून गावोगावी जाऊन प्रचार,बूथ रचना,कोपरा सभा करत आहे. ह्या निवडणूकित परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि आवताडे यांचा संत दामाजी परिवार एकत्र आल्याने एक मोठेच आव्हान विरोधकांपुढे उभे आहे.ह्या दोन्ही परिवारात मावळचा संत तुकाराम महाराज परिवार,बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली समन्वय साधून समाधान आवताडे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या