Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोरक्षक , मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियाकडून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी..



आळेफाटा- गौ माताची सेवा करणारे स्वामींच्या वाहन चालकाच्या व स्वामींच्या प्रशासकीय सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे कुठलाही अघटित प्रकार घडला नाही व गोमाफियांचे प्रयत्न असफल झाले..!
याबाबत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात गोमाफियांविरूद्ध  फिर्याद नोंदवली असून त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनने गोमाफियांविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 307 ( जीवे मारण्याचा प्रयत्न ) , 341 , 336 , 427 , 14 , 143 , 147 , 148 , 149 , 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे..

         आणे गावात कसायांनी स्वामींचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला...तिथेही " कसाई स्वामी को आज मार डालो " ये आज जिंदा नही बचना चाहिये " असे ओरडत हल्ला केला...तिथून निसटून स्वामी आळेफाटा पोलीस स्टेशनला निघाले तरी ते कसाई आणे गावापासून स्वामींच्या वाहनाचा पाठलाग करतच होते...राजूरी गावचे गतिरोधक इथे वाहनाचा वेग कमी केला त्याठिकाणी शिवशंकर स्वामींच्या वाहनाला गोमाफियांनी गाडी आडवी मारून थांबवले व 6-7 कसाई गाडीतून उतरून स्वामींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला...गोमाफियांनी लोखंडी पाईप , लाकडी दांडके व रस्त्यावर पडलेले दगड गाडीवर मारून स्वामींच्या वाहनाचे अतोनात नुकसान केले...व पुन्हा जीवे मारण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याच्या धमक्या देत होते...सदर प्रकार घडत असताना स्वामींच्या वाहनाचे चालक यांनी वेगाने गाडी मागे घेत तिथून आळेफाटा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली...शिवशंकर स्वामी यांनी स्वतःचे मनोधैर्य थोडेही डगमगू न देता सोबतच्या सहकाऱ्यांचे ही मनोधैर्य वाढवले व हल्ल्याच्या ठिकाणाहून आळेफाटा पोलीस ठाण्यात हजर झाले... गोमाफियांची गुर्मी व उर्मटपणा इतका वाढलेला आहे की पुन्हा स्वामींच्या वाहनाचा पाठलाग करत आळेफाटा पोलीस स्टेशन आले व त्या गोमाफियांनी पोलीस स्टेशनच्या आवारातही पुन्हा ह्या स्वामींना जीवे मारण्याचा प्रयत्न करत त्याठिकाणी धक्काबुक्की केली...व पोलीस स्टेशनच्या आवारात " इस स्वामीको मार डालो , ये हम लोगोको धंदा करने नही देगा " अश्या धमक्या देत होते...सदर प्रकार घडल्यानंतर समस्त महाराष्ट्रातील गोरक्षक , गोप्रेमी , हिंदुत्ववादी तरुण मोठ्या संख्येने आळेफाटा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले होते...समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष गुरूवर्य श्री. मिलिंदभाऊ एकबोटे व शिवशंकर स्वामींनी जमलेल्या गोरक्षक तरुण वर्गाला शांतता राखण्याचे व आपआपल्या निवासस्थानी परत जाण्याचे आवाहन केले...पण समस्त गोरक्षक व गोप्रेमींनी पोलीस प्रशासनाला ह्या घडलेल्या निंदनीय प्रकाराबाबत गोमाफियांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी नाहीतर  " ह्या कसायांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू " अश्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत...खेड , आंबेगाव , जुन्नर तालुक्यात गावागावातील सर्व गोरक्षकांनी , हिंदुत्ववादी संघटनांनी , गोप्रेमींनी ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत स्वतः स्वामींच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचा निर्धार केला आहे...भीमाशंकरच्या कुशीत , विघ्नेश्वराच्या भूमीत , छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी एकही गोवंशाची कत्तल होऊ देणार नाही असा दृढ संकल्प यावेळी गोरक्षकांनी केला...तरी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या गोष्टीची दखल घ्यावी व पुन्हा असा निंदनीय प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन गोरक्षकांनी केले.

-----------------------------