महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण झालेले दिसते. आज महाराष्ट्र सरकारमधील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्र पक्षातील महाआघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना दर महिना शंभर कोटी ची वसुली करायला सांगितले.असे मा.पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे पत्र प्रदर्शित झाल्यामुळे महाआघाडीचे पाय चिखलात फसले आहे.त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.
व्हिडिओ पहा...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी, मावळ तालुका यांच्या वतीने वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिर ते वडगाव पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकार बद्दल नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तालुका सभापती निकिता घोटकुले,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर ,शांताराम कदम,जिजाबाई पोटफोडे,सुवर्णा कुंभार,ज्योती शिंदे,जि. प.सदस्य नितीन मराठे,अलकताई धानिवले,सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे,मा.नगरसेवक संभाजी म्हाळसकर,नितीन कुडे,सुधाकर ढोरे,रमेश ढोरे, धनगर आघाडी अध्यक्ष नामदेव शेडगे आदी कार्यकर्ते तसेच मान्यवर आंदोलनामध्ये सहभागी होते.
_________________
वसुंधरा न्यूज मावळ
_________________
0 टिप्पण्या