मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
हॉटेल, बारकडून वसूलीचं टार्गेट
अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रामुळे राज्य सरकार अडचणीत आले असून अजून किती प्रकरणे बाहेर येतात याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.काही दिवसापूर्वी वाजे यांचे निलंबन करण्यात आले त्यानंतर परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती.
आघाडी सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे जनता यांना पायउतार केल्याशिवाय राहणार नाही – अभिमन्यू शिंदे अध्यक्ष –भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ
0 टिप्पण्या