Ticker

6/recent/ticker-posts

vadgaon–भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठवडे बाजारातील विक्रेत्यांना मास्क , सॅनिटायझर वापराबाबत सुचनापर जनजागृती...


वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वडगांव मावळ येथील आठवडे बाजारातील  भाजी , फळे , कपडे इतर वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मास्क आणि सॅनिटायझर वापराबद्दल जनजागृतीपर सूचना करण्यात आल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर हे अत्यंत महत्वाचे साधन असल्याने सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करणे अनिवार्य असल्याची माहिती यावेळी विक्रेत्यांना देण्यात आली आणि मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष किरण भिलारे , नगरसेवक प्रसाद पिंगळे , मावळ तालुका भारतीय जनता पक्ष प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे , योगेश कृ. म्हाळसकर , युवा मोर्चा कार्याध्यक्ष शेखर वहिले , महेंद्र अ. म्हाळसकर , क्रिडा आघाडी अध्यक्ष महेश म्हाळसकर आदी उपस्थित होते.

___________________________
वसुंधरा न्यूज मावळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या