आज जागतिक चिमणी दिवस आजच्या दिवशी चिमणी दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. जगामध्ये विविध ठिकाणी चिमणी संवर्धन बाबत कार्य केले जातात असेच कार्य आपल्या तळेगाव दाभाडे येथील अविनाश नागरे यांनी पशुपक्षी संवर्धनासाठी गेली पंचवीस वर्षापासून पासून पशुपक्षी तसेच चिमणी संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे.
पशुपक्ष्यांसाठी प्रामुख्याने चिमणी ,घुबड पोपट, टिटवीयांच्यासाठी एक छोटेसे घरटे तयार केले असून ते तळेगाव शहरामध्ये पशुपक्षी प्रेमी तसेच चिमणी प्रेमी आहेत त्यांना दिले आहेत. काही ठिकाणी जनजागृतीसाठी माता-भगिनींना हळदीकुंकवाचा कार्यक्रम मध्ये भेट स्वरूपातही पशुपक्षी यांचे घरटे भेट स्वरूपात दिले आहेत आज पर्यंत त्यांनी तळेगाव कामशेठ इतर ग्रामीण ठिकाणी तसेच कोल्हापूर सांगली अशा विविध ठिकाणी ही घरटी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला असून आज पर्यंत त्यांच्याकडे ८०० चिमण्यांच्या घरट्यांची नोंद झाली आहे हा त्यांचा उपक्रम कौतुकास पात्र आहे.
अविनाश नांगरे हे खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत असताना त्यांनी चिमणी संवर्धन त्याचप्रमाणे घुबड पोपट टिटवी असे अनेक पक्षांना घरट्यांचा आसरा देऊन संवर्धनाचे काम करीत आहेत या कामांमध्ये त्यांना तळेगाव दाभाडे लॉटरी क्लब यांचेही योगदान मिळत आहे त्याचप्रमाणे त्यांचे मित्रही त्यांना या कामामध्ये साथ देत मदत करीत आहे निश्चितच त्यांच्या कामामुळे पशुपक्षी वाढीसाठी योगदान ठरणार आहे आज या सिमेंटचे जंगलामध्ये पशुपक्ष्यांना राहण्याची जागा नाही आज त्यांना घरटे बांधण्यासाठी त्यांना लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणातमिळत नाही त्यामुळे त्या चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे प्रामुख्याने आज आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो त्या ठिकाणी सुतळी चा धागा झाडांचा पाचोळा अशा अनेक वस्तू पासून ते आपली घरटी बनवत असतात आता त्यांच्यासाठी घरटे बांधण्यासाठी नैसर्गिक साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे नसल्यामुळे आज आपल्याला शहरी भागामध्ये पशुपक्षी तुरळक प्रमाणा दिसतात आहे त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम .
गेली पंचवीस वर्षापासून मी पशु पक्षी संवर्धनाचे काम करतो आतापर्यंत आठशे घरटी वाटप केले असून त्यामध्ये योग्य प्रकारे पशु पक्षांचे संवर्धन होते यामध्ये सर्वांनी सहभाग असावा –अविनाश नांगरे ,पशुपक्षी प्रेमी तळेगाव दाभाडे मो.न.९८८१४७१९३०
______________________
वसुंधरा न्यूज मावळ
______________________
0 टिप्पण्या