Ticker

6/recent/ticker-posts

karanjgaon–करंजगाव पठारावरील धोंडीबा गोविंद ठिकडे, यांचे वनवा लागल्यामुळे गुरांसाठी जमा करून ठेवलेल्या गवताचे(चारा) खुप मोठे नुकसान...

करंजगाव (मोरमारेवाडी) –करंजगाव  पठारावरील धोंडीबा गोविंद ठिकडे, यांचे वनवा लागल्यामुळे गुरांसाठी जमा करून ठेवलेल्या गवताचे(चारा) खुप मोठे नुकसान झाले आहे. शिकारी साठी फिरणाऱ्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वनवा पेटवण्याचा संशय आहे. वणव्याचीआग ठिकडे यांच्या जवळ आली परंतु घरी वयस्कर माणसे असलेल्यामुळे आग विजवणे  शक्य झाले नाही , संपूर्ण गवताची वैरण जळून खाक झाले आहे.

           धोंडीबा ठीकडे जवळ  लहान मोठ अशी २३ जनावरे आहेत त्यामध्ये ९, म्हैस, २ बैल, ७, गाई  ५ बारीक वासरे आहे, पठारावरील या शेतकर्यांने  पुढील पावसाळ्याचे सहा महिने पुरेल एवढी वैरण जमा करून ठेवली होती . 
     
             संपूर्ण जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा जळून खाक झाले आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही उदरनिर्वाहासाठी जनावरांपासून ,१०ते १२ लिटर  दुध मिळत असे,दुध घेऊन रोज वडेश्वर या ठिकाणी जात होता किरकोळ विक्री पासून  आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे. परंतु आता  ऐण उन्हाळ्यात वैरण मिळणार कोठून संपूर्ण जनावरे चार्या पासून उपाशी राहतील की काय ? या विवंचनेत हा शेतकरी आहे . तरी दानशूर व्यक्तींनी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पठारावरील वनण्याचे प्रमाण वाढले आहे शिकारी लोकांना प्रशासनाने जबर बसावी –नामदेव शेडगे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या