तळेगाव दाभाडे दि.१३– तळेगाव दाभाडे स्टेशन येथील तळ्यावरील झाडांना लागलेली आग विझविण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्नीशमन अधिकारी श्री.पद्मनाभ कुल्लरवार यांनी अग्नीशमन गाडी डिझेलअभावी वापरता आली नाही.हा खोटा खुलासा केला व स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला.मनमानी कारभार करणाऱ्या व आग लागण्यासारख्या गंभीर प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित अधिकारी श्री.पद्मनाभ कुल्लरवार यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.अग्नीशमन विभाग सारखा महत्वपूर्ण आणि संवेदनशील विभाग सांभाळण्यासाठी आवश्यक जबाबदार पणा असलेल्या अधिकार्याची नेमणूक करुन तळेगावकर नागरिकांना आश्वस्त करावे ही मागणी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने केली आहे.
अग्नीशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांनी डिझेल चे कारण देत कर्तव्य बजावण्यामध्ये हलगर्जीपणा करत आहेत त्यांचं तात्काळ निलंबन कराव – रवींद्र माने , अध्यक्ष भाजपा तळेगाव दाभाडे शहर
0 टिप्पण्या