"तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण...चराचर शरण
श्री स्वतंत्रते...श्री स्वतंत्रते...श्री स्वतंत्रते
तळेगाव दाभाडे –भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने आज भाजपा कार्यालय येथे महान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५५ व्या आत्मार्पण दिना निमित्त प्रतिमापूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भा.ज.महिला मोर्चा कार्याध्यक्षा सौ.अश्विनीताई काकडे आणि सरचिटणीस सौ.मीनाताई भेगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर गि.खेर यांनी स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
भाजपा शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,संघटनमंत्री सचिनभाऊ टकले,सरचिटणीस प्रदिप ज्ञानेश्वर गटे,भाजपा युवती आघाडी कार्याध्यक्षा धनश्रीताई बागले,महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ.रुपालीताई दिपक भेगडे,सौ.संज्योक्ताताई प्र.आगळे,भाजयुमो सरचिटणीस निखिल कृ.म्हाळसकर,उपाध्यक्ष गणेश भेगडे,ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव,माजी चिटणीस राहुल पारगे,उपाध्यक्ष आशुतोष हेंद्रे,गणेश जवळेकर,समीर भेगडे,सागर जवळेकर हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या