कामशेत - कामशेत शहरात मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,मा.उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे यांच्या संकल्पनेतून "मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत" या पथ विक्रेते योजनेचा माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी १६० लाभार्थी व्यवसायिकांना दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र,कामशेत शाखेचे व्यवस्थापक सचिन अहिवळे यांनी व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.यावेळी सह व्यवस्थापक शुभम श्रीवास्तव, श्रीहरी गायकवाड,बँक कर्मचारी बाळासाहेब ननावरे आदी लाभार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते.
अजूनही जे कोणी पथ धारक लाभ घेण्यापासून वंचित असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा –गणपत शिंदे मा. उपसरपंच
______________________
वसुंधरा न्यूज मावळ
______________________
0 टिप्पण्या