Ticker

6/recent/ticker-posts

Mumbai–राज्यात घडत असलेल्या घटनांचा अहवाल देण्यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या भेटीला....

Mumbai: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचावरील आरोप गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. 

               भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी ९:३० वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. गेल्या तासाभरापासून भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु आहेत.


                राज्यपालांना राज्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांचा अहवाल देण्यात आला. तसेच खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे,” अशी मागणी फडणवीसांनी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या