Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुक्याला लागले लाचखोरीचे ग्रहण महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खाली लाच घेताना डॉ. वाढोकर यांना अटक

तळेगाव दाभाडे दि.२३ : पवना हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनारोग्य योजने अंतर्गत संपूर्ण मोफत औषधोपचार असताना, रुग्णाच्या नातेवाईकाकडून ९०००  रुपयांची लाच घेताना डॉक्टर व खाजगी इसमाला रंगेहात अटक केली. ही घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ४ वा. पवना हॉस्पिटलमध्ये घडली.

       लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू नामदेव आंद्रे वय ६५ रा. नाणे ता. मावळ यांचे मागील सहा महिन्यांपासून पवना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत डायलिसिस व औषधोपचार असता, तक्रारदार नंदकुमार उर्फ गोट्या आंद्रे यांच्याकडून महिन्याला २०,००० रूपये घेत होते.
 तक्रारदार आंद्रे यांचे वडील अडीच वर्षांपासून उपचार घेत होते.
शासनाची संपूर्ण मोफत योजना असताना,  पवना हॉस्पिटल शासनाकडून रुग्णाचे पैसे घेत आहेत. तक्रारदार यांना १०,००० रुपयाच्या  लाचेची मागणी केली असता, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली. याप्रकरणी डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर ( वय ५८, रा. पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा,ता.मावळ,जि.पुणे) व पवना हॉस्पिटल मार्केटिंग ऑफिसर
  प्रमोद वसंत निकम (वय ४५, रा. दत्तवाडी आकुर्डी ता. हवेली)  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

       काही दिवसांपूर्वी कामशेत येथे नेवाळे यांच्या जामीन मिळवण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडले होते. अशा घटना घडत असताना मावळ तालुका लाचखोरीचे ग्रहण लागले की काय असे सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे.
___________________
वसुंधरा न्यूज मावळ
___________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या