Kamshet:कामशेत शहरामध्ये रोज
कोरोना रुग्णात होतं असलेली वाढ चिंतेचा विषय आहे. दि.२३ रोजी १० व दि.२४ रोजी ८ रुग्ण भेटले असे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खात्यावर ताण वाढला आहे.पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाचा आकडा ५० च्या वरती गेला आहे.सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत दुर्लक्ष झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असून याकडे
नागरिकांनी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
ग्रामपंचायत खडकाळा यांच्या वतीने मंगळवारचा आठवडे बाजार हा तात्पुरता बंद असल्याचे आवाहन आले होते.परंतु भाजी विक्रेत्याना बाजार बंद असल्याची माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी आणलेला माल बाजारात विक्रीसाठी ठेवला होता.त्यामुळे नागरिकांची बाजार बंद की चालू आहे अशी फसगत झाली होती.
कामशेत सूक्ष्म प्रतिबंधित झोन तसेच बफर मध्ये मध्ये येत असून तसे आदेश प्रशासनानेही दिले आहेत.ग्रामपंचायत खडकाळे यांनी पथके तयार करून बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर व सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी विनंती मा. उपसरपंच अभिमन्यू शिंदे यांनी ग्राम विकास अधिकारी जगजीवन मदरिया यांना केली आहे.
__________________
वसुंधरा न्यूज
__________________
0 टिप्पण्या