Ticker

6/recent/ticker-posts

maval- कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे “बार्डो ” या राष्ट्रीय पुरस्कार विजेता सर्वोत्तम मराठी चित्रपटातील कलाकारांचा सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने संपन्न!

मावळातील तळेगाव दाभाडे शहर येथील  कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे दि.२८ रविवार रोजी “बार्डो ” या राष्ट्रीय पुरस्कार विजेता  सर्वोत्तम मराठी  चित्रपट यातील कलाकारांचा सत्कार भाजप सांस्कृतिक आघाडी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात श्री नटराज पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सांस्कृतिक आघाडीचे कार्याध्यक्ष गणेश उंडे यांनी केले.तर सुत्रसंचालन अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी केले.
तळेगावातील कलापिनी मधे घडलेले कलाकार मिहिर देशपांडे, सतीश ढेम्बे, केतकी लिमये,  प्रणव जोशी, सचिन खराडे, विशाल सांगळे, ओंकार ढोरे, डॉक्युमेंट्री फिल्म पुरस्कार प्राप्त सौ.पूजा डोळस, लाडूचा लड्डू शॉर्ट फिल्म कलाकार कु.प्रणव केसरकर तसेच कलाकार घडविणारे डॉ.अनंत परांजपे यांचे सत्कार करण्यात आले.
भाजपा शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही कलाकारांचे कौतुक करण्यासाठी कायम तत्पर राहू अशी ग्वाही दिली.भाजपा तळेगाव शहर सरचिटणीस  रविंद्र साबळे,  माजी नगरसेवक ॲड श्रीराम कुबेर, भाजपा प्रज्ञा आघाडी कार्याध्यक्ष पद्मनाभ पुराणीक उपस्थित होते.
कलापिनीचे अध्वर्यु डॉ.अनंत परांजपे आपल्या भाषणात म्हणाले की तळेगाव हे कलाकाराची खाण आहे.या कलाकाराचा सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप आज भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीच्या वतीने दिली हा दुर्मिळ योग आहे.आजपर्यंत कुठल्याच पक्षाने असा कार्यक्रम घेतला नव्हता.याबरोबरच कलापिनी फिल्म क्लबचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कलाकारांना आवाहन केले.कलापिनी ही आपली संस्था समजून सर्वांनी ही संस्था मोठी करण्याची साद घातली.
कलापिनीचे अध्यक्ष विनायक  अभ्यंकर यांनीही या कार्यक्रमाचे  व आघाडीचे कौतूक केले.
यावेळी रविंद्र साबळे,  पूजा डोळस, केतकी लिमये, प्रणव केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कलापिनीचे  ज्येष्ठ कार्यकते विनायक भालेराव,  विश्वास देशपांडे,  रामचंद्र रानडे,  होनप, बकरे व  पांढरे काकू,  संजय मालकर, यश हंबीर हे उपस्थित होते. हा काय॔क्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीचे केदार अभ्यंकर,  श्रीपाद भिडे, आणि अनुराधा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या