Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता हाच संघटणेचा पाया - विकास लिंभोरे

पवनानगर - मोरवे येथे दि.२७ रोजी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे आणि करण गोणते  मोरवे येथील राजू शिंदे यांच्या नविन किराणामालाच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित गेले होते. उद्घाटन हे रात्री आठ वाजता झाले मोरवे हे गाव मावळातील शेवटचे टोक उद्घाटन झाल्यानंतर तेथील माता-भगिनी तरुण कार्यकर्ते व वयोवृद्ध आजी आजोबा यांच्यासोबत ते गप्पा गोष्टी करत असताना कधी रात्रीचे अकरा वाजले कळालेच नाही. 

         रात्री तिथून कार्यक्रम उरकून निघाले असता सहकारी करण भाऊ गोनते व त्याच्या घरातल्यांनी रात्री साडेअकरा वाजता खास जेवणाचा आग्रह धरला व एवढ्या रात्री स्वयंपाक करून आम्हाला जेवण करून जेवायला घातले तेव्हाच त्यांनी आम्हाला सोडलं.  सांगायचं कारण एवढेच की ही ओळख आहे ही फक्त आमच्या भाजप पक्षामुळे व आम्ही निस्वार्थ समाजिक उपक्रम राबवत असलेली आम्हाला आमच्या कामाची पावती यातून अजून एक दिसून आले ती म्हणजे माझ्या भारतीय जनता पार्टीचे संस्कार करण भाऊ गोणते व त्यांच्या परिवारात पहायला मिळाले असे विकास लिंभोरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या