Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

      शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
      दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत विचारलं असता अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला. मात्र आता महाराष्ट्राकडे आमचं लक्ष आहे. कोणासोबत सरकार बनवणार ते भविष्यात कळेलच, असं अमित शहा म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या