Ticker

6/recent/ticker-posts

Maval–भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी रामनाथ शेटे यांची नियुक्ती...


मावळ–भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी वतीने वाघोली येथे पदनियुक्ती च्या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील नवलाखउंबरे येथील युवा उद्योजक रामनाथ शेटे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीचे पत्र नियुक्ती पत्र भाजपा आमदार सन्माननीय नितेश राणे,यांच्या हस्ते देण्यात आले. प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय गणेश जी भेगडे, माजी आमदार सन्माननीय बाबुरावजी पाचर्णे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा नेते सन्माननीय प्रदीपदादा कंद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब सातव, सौभाग्यवती स्वरदाताई बापट, भाजपा विद्यार्थी आघाडी पूणे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

            रामनाथ शेटे यांची नियुक्ती झाल्याने नवलाख उंबरे तसेच तालुक्यामध्ये युवा वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून तालुक्यात विद्यार्थी आघाडी अधिकच सक्षम होणार आहे.

___________________
वसुंधरा न्यूज
___________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या