वडगाव मावळ दि.७ (प्रतिनिधी)
बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने काल(दि.६) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.तसेच काहि दिवसांपूर्वी महिला न्यायाधीश लाच प्रकरण ताजे असताना हे मावळ तालुक्यातील दुसरे प्रकरण उघडकीस आले.त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये कायदा- सुव्यवस्थाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
बाळासाहेब नेवाळे यांच्यावरील चुकीच्या पोलीस कारवाईच्या विरोधात भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तसेच मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्य परिस्थिती सांगून दि.२४ फेब्रुवारी रोजी मावळ बंदची हाक दिली होती.
व्हिडिओ पहा–
आमदार प्रतापदादा अडसड यांनी अधिवेशनात अमरावती जिल्हा बँकेत झालेली ७०० कोटीची चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक आणि ३.५० कोटी रूपये नियमबाह्य पद्धतीने कमीशन ची पूर्तता करण्याचा प्रयत्न उघड केला.त्याचबरोबरपुणे जिल्हा बँकेच्या संदर्भात चुक नसतांना बाळासाहेब नेवाळे यांना कोठडी सुनावल्या जाते आणि इथे ७०० कोटी चुकीच्या पद्धतीने गुंतविल्या चालले ३ कोटी नियमबाह्य पद्धतीने कमीशन घेतल्या चालले तरी सुद्धा कार्यवाही नाही. पुण्याला भाजपचे नेते आहेत म्हणून एक न्याय आणि दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात कॉंग्रेस च्या नेत्यांना दुसरा न्याय हि सरकारची दुटप्पी भूमिका का आमदार प्रताप अडसड यांनी मांडली.
यासर्व प्रकरण पहाता नागरिकांनमध्ये चर्चा आहे की बाळासाहेब नेवाळे यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली आहे का?
0 टिप्पण्या