कामशेत–ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे मध्ये सरपंच पदाची निवडणूक होऊन पंधरा दिवस झाले असतानाच ग्रामपंचायत कारभरा मध्ये सदस्य व्यतिरिक्त बाहेरील लोकांचा जास्त हस्तक्षेप वाढत आहे.यामुळे नक्की नागरिकांमध्ये आपण दिलेले निवडून उमेदवार कोण आहेत असा संभ्रम निर्माण होत आहे.
मावळ तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून खडकाळे ग्रामपंचायत कडे पाहिले जाते.यामध्ये १७ सदस्य असतानाच नागरिक आपले विविध प्रश्न घेऊन आपण निवडून दिलेल्या उमेदवाराकडे ग्रामपंचायत मध्ये येत असतात.परंतु ग्रामपंचायत मध्ये बाहेरील व्यक्ती जास्त हस्तक्षेप करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कामशेट करांनी सक्षम १७ उमेदवार निवडून दिले असताना सदस्य व्यतिरिक्त बाहेरची व्यक्ती हस्तक्षेप करीत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
0 टिप्पण्या