Ticker

6/recent/ticker-posts

लोहगड येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरविल्याबद्दल महिलांकडून मा.मंत्री बाळा भेगडे यांचा सन्मान....

मावळ:-मावळ तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासिक असलेल्या लोहगड या गावात गेल्या 60 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती.महिलांना २ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पायपीट करून पाणी आणावे लागतं असे.
    मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून लोहगड हे मावळ तालुक्यातील पहिले गाव आहे जेथे गावातील प्रत्येक घराला मीटर पद्धतीने नळ जोडणी करून महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात आला आहे.
    आज लोहगड येथील महिलांनी त्याच्या डोक्यावरचा हंडा उतरविल्याबद्दल जागतिक महिला दिनानिमित्तानं सर्व महिलांच्या वतीने मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांचा सन्मान करण्यात आला.
    यावेळी उद्योजक धवल बारोट,चैत्राली बारोट सभापती निकिता घोटकुले,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धनीवाले,सुमीत्राताई जाधव,मा.सभापती कल्याणीताई ठाकर,गणेश धानीवाले,सरपंच नागेश मरगळे,वसंत म्हसकर,सरपंच खंडू कालेकर सर्व महिला ,ग्रामस्थ उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या