कामशेत दि.२१–कामशेट शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी कार्यक्षेत्र करिता घटना व्यवस्थापक म्हणून नेमले आहे. त्यानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजनाचे अधिकार देण्यात आलेले आहे.या आदेशाने तहसीलदार,तालुका आरोग्य अधिकारी मावळ यांनी सूचित केलेल्या नुसार तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग संक्रमित रुग्ण आढळले असून सदर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विषाणूच्या प्रचाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एक संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस संपर्कात आल्याने होते.या कारणास्तव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता जास्त आहे.यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी माननीय उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्के यांनी कामशेट मधील काही भाग हा सूक्ष्म प्रतिबंधित झोन तसेच बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
१) करोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनेचे काम करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी पोलीस विभागीय राज्य व केंद्रीय विभागाचे कर्मचारी वाहने वैद्यकीय सेवा, आवश्यक सेवा पुरवणारी कर्मचारी वाहने वगळता अन्य व्यक्ती या संबंधित सूक्ष्म प्रतिबंधित झोन मध्ये प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास बंदी असेल.
२) आदेशात नमूद शेत्रात 65 वर्षावरील व्यक्ती अति जोखीम आजार त्यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब दमा यकृत व विक्रम मूत्रपिंडाचे आजार कर्करोग असलेले व्यक्ती तसेच गरोदर महिला वय वर्ष दहा वर्षापेक्षा कमी वय वयोगटातीलत मुले यांना आत्त आवश्यक सेवा वैद्य किती वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाता येणार नाही.
३)पूर्व तपासणी शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात व्यक्ती व वाहनांना प्रवेश करता येणार नाही .
४) प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला नोंदी ठेवणे आवश्यक आहे असे आदेश देण्यात आलेले आहेत
सूक्ष्म प्रतिबंधित झोन...
रिद्धी सिद्धी आपारमेंट बाजारपेठ, कल्पतरू गॅस एजन्सी, पंडित कॉम्प्लेक्स रुग्ण असलेला फ्लॅट , महावीर किराणा शॉप पोलीस स्टेशन जवळ, नवयुग मित्र मंडळ जवळ, ग्रीन मेडोज सोसायटी प्लॉट नंबर 5, बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम जिल्हा परिषद शाळे जवळ, दत्त कॉलनी रुग्ण रहिवासी, जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तेथे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.तसेच या जवळील क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
सुरक्षेचे नियम पाळणे गरजेचे आहे .कामशेत बाजारपेठ मोठी असल्याने तिथे 40 ते 50 गावातील नागरिकांचा संपर्क असतो यामुळे करोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते की असे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग व तोंडाला माक्स लावूनच निघावे असे आवाहन मा.उपसरपंच अभिमन्यू शिंदे यांनी केले आहे.
_________________
वसुंधरा न्यूज मावळ
_________________
0 टिप्पण्या