जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतून कामशेत शहरातील माऊली नगर येथील अर्धवट राहिलेले रस्ता क्रॉंकीटीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे जिल्हा वार्षिक योजना २५१५ अंतर्गत पंधरा लाख रूपये (१५,००,०००.००) निधी मंजूर लवकरात लवकर रस्ता क्रॉंकीटीकरण होणार पुर्ण होणार असून माऊली नगरची गेली पंचवीस वर्षापासून असलेली मागणीही पूर्ण होणार आहे यापूर्वीही ग्रामपंचायतच्या माध्यमातून 34 लक्ष रुपये खर्चून रस्ता करण्यात आला होता त्याचा उर्वरित काम आता पूर्ण होणार असून अर्धवट रस्त्याचे काम होऊन ग्रामस्थांची वणवण थांबणार आहे अशी माहिती ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे ग्रामपंचायत मा उपसरपंच विद्यामान सदस्य गणपत शिंदे यांनी दिली
प्रशासकीय काळामध्ये ग्रामपंचायत खटकाळेे यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यामध्येेे 50 लक्ष रुपये मंजूर झाले असून शहरांामध्ये विविध विकास कामे होणार आहेत.
0 टिप्पण्या