जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर , सिंधुताई सपकाळ अशा अनेक आपल्याकर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
मावळ तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आंदर मावळातील माळेगाव पिंपरी येथील सर्वसाधारण कुटुंबातील तसेच आदिवासी समाजातील सौ सीमा पांडुरंग वासावे या भगिनींनी खडतर प्रवास करून गावात विकासाचे ध्येय बाळगत राजकारणामध्ये सक्रिय झाल्या घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आणि जनतेनेही त्यांच्या वरती विश्वास दाखवत मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून दिले त्यांनी गाव विकासाचे ध्येय उराशी ठेवले आहे निश्चितच त्या येत्या काळामध्ये आपल्या गावांमध्ये विविध योजनांचे अंमलबजावणी करून विकास करतील व आपल्या गावाचे नाव तालुक्यांमध्ये उज्वल करतील अशा मातेला महिलादिनानिमित्त सदिच्छा
_____________________
वसुंधरा न्यूज
_____________________
0 टिप्पण्या