कामशेत – ग्रुप ग्रामपंचायत कांबरे ,कोंडीवडे ना.मा. सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये मा. सभापती गणेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असून सरपंचपदी सुवर्णा भाऊ गायकवाड तसेच उपसरपंचपदी किरण लक्ष्मण गायकवाड यांची बहुमताने निवड करण्यात आली.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत मधील विद्यमान सदस्य स्वामी आनंता गायकवाड, कविता गायकवाड ,पिंकी हेमंत राऊत , सीमा सचिन गायकवाड यांनी मतदान केले. यावेळी देवराम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, काळुराम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, विशाल भांगरे ,हर्षद गायकवाड मधुकर गायकवाड, वसंत गायकवाड, रोहिदास गायकवाड , सुदाम गायकवाड, राघू गायकवाड, तुकाराम गायकवाड, मारुती गायकवाड, हेमंत राऊत माणिक गायकवाड ,विष्णू गायकवाड, भरत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे ,मा. गुलाबकाका म्हाळसकर, संतोष कुंभार, सरचिटणीस सुनील चव्हाण मा. सरपंच दत्ता खेंगले आदी तालुक्यातील पदाधिकारी यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
________________
वसुंधरा न्यूज मावळ
________________
0 टिप्पण्या