वडगाव दि.२६:- "भाजपच्या सत्ताकाळात मंजूर झालेल्या तालुक्यातील सर्व विकासकामांच्या भूमीपूजनाची व पुर्ण झालेल्या कामांच्या उद्धाटनाची संधी विरोधकांनी घेऊन विकासकामे पुर्णत्वास न्यावीत अन्यथा पुढील काही दिवसांतच या कामांची उद्घाटने भाजपच्या कार्यकर्त्यांनाच करावी लागतील" अशी मिश्किल टिप्पणी मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी येथील प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका सुनिताताई भिलारे यांच्या प्रयत्नातून झालेल्या रस्त्याच्या लोकर्पण सोहळ्यावेळी व्यक्त केली.
भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुनिता भिलारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक १३ मधील २१ लक्ष रुपये निधीतून पहिल्या टप्प्यात झालेल्या कॉंक्रीट रस्ता,बंदिस्त ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन इत्यादी विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.तसेच पुढील आठवड्यात चालू होणाऱ्या १५ लक्ष रु.निधीच्या प्रभागातील आणखी एका रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाची माहिती देण्यात आली.
यावेळी मावळ भाजपचे प्रभारी,भास्कराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात, "विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी शहराचे नगराध्यक्ष यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते;कारण आपण आता एका पक्षाचे नसून संपूर्ण शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून काम पहात आहात.हे कायम स्मरणात ठेवून निपक्षपाती काम केले पाहिजे "असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी नगरपंचायत च्या सी. ओ. सुवर्णा ओगले म्याडम मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहर अध्यक्ष किरण भिलारे, गटनेते,दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, दिलीप म्हाळसकर,दीपाली मोरे,दशरथ खेंगले,प्रसाद पिंगळे,शामराव ढोरे, मा.अध्यक्ष नारायण ढोरे,मा,सरपंच संभाजी म्हाळसकर,सुधाकरराव ढोरे ,मा सदस्या शांताबाई भिलारे,गणेश भेगडे,जेष्ठ नेते किसनराव भिलारे, वसंत भिलारे,सोमनाथ काळे,खंडूशेठ भिलारे,युवक अध्यक्ष रमेश ढोरे,रविंद्र म्हाळसकर,महेंद्र म्हाळसकर तसेच कार्यकर्ते व प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी कल्पेश भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.विनायक भेगडे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या