वडगाव:-महावितरणाने वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल दिले आहेत.लॉकडाऊन काळात व त्यानंतर मिटर रिडींग न घेता वाढीव बिल आकारून वीज बिल सर्वसामान्य नागरिकांना वितरित करण्यात आली.सरकारने वीज बिल माफीचे आश्वासन पाळले नाही उलट त्वरित वीजबिल भरले नाही तर महावितरणने वीज जोडणी तोडण्याचा तगदा लावलेला आहे.सर्वं सामान्य नागरिक वाढीव बिलाबद्दल चौकशी करायला गेल्यास महावितरण कार्यालयातील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहे.
महाआघाडी सरकारच्या आणि महावितरणाच्या या अरेरावी विरोधात मावळ तालुका भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 22/ 2/ 2021 रोजी वडगाव पंचायत समिती,वडगाव येथे लक्षणीय उपोषण करणार आहे.अशी माहिती भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी दिली.
__________________
0 टिप्पण्या