Ticker

6/recent/ticker-posts

◆तळेगाव दाभाडे:-मा.राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.... ◆वीज बिल कमी न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा...

    ७२ लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडीत करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही निर्णयाविरोधात महावितरणला टाळे ठोको आंदोलनात
मा.राज्यमंत्री श्री संजय तथा बाळा भेगडे यांनी आवाहन केले की सरासरी वीजबिलाची दुरूस्ती केल्याशिवाय वीज कनेक्शन तोडु नये.अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला.
       जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी शिवसेनेच्या दुटप्पीपणावर टिका करुन छोटे व्यावसायिक,दुकानदार यांच्या व्यवसायामध्ये आलेल्या चढउतारांचा विचार करुन वीजबिले द्यावीत.तसेच शेतकर्यांच्या पंपाची वीज तोडु नये अशी मागणी केली.
          शहराध्यक्ष श्री.रविंद्र माने यांनी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी भावना व्यक्त करुन महावितरण कार्यालयाला टाळे ठोकल्या शिवाय थांबणार नाही अशी भुमिका मांडली.
उपनगराध्यक्ष सुशीलभाऊ सैंदाणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये नागरिक भरडले जात असल्याची टिका केली.
         यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे,गटनेते अमोल शेटे,सरचिटणीस रजनीताई ठाकूर,महिला मोर्चा त.स्टेशन विभाग अध्यक्षा अंजलीताई जोगळेकर,गाव विभाग अध्यक्षा मोहिनीताई भेगडे,अध्यक्ष शिवांकुर खेर,व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, युवती आघाडी अध्यक्षा कु.अपूर्वाताई मांडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
           यानंतर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून धरणे आंदोलनाला बसले असता या वेळी महावितरणाचे अधिकारी राजेंद्र गोरे यांनी शहरातील एकही वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.
          यावेळी टाळे ठोको आंदोलनाला नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे,माजी नगराध्यक्ष श्री.दादा जांभूळकर,नगरसेवक श्री संतोषजी शिंदे,नगरसेविका सौ.शोभाताई भेगडे,सौ.काजलताई गटे,मा.सभापती राजेश सरोदे,मा.नगरसेवक श्रीराम कुबेर,सरचिटणीस विनायकजी भेगडे,रविंद्र साबळे,प्रदीप गटे,प्रमोद देशक,रविंद्र भोसले,सचिव महावीर कणमुसे,युवा मोर्चा अध्यक्ष गाव विभाग श्री.अक्षय भेगडे,कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,कार्याध्यक्षा अश्विनीताई काकडे,स्टेशन भाग कार्याध्यक्षा तनुजाताई दाभाडे,
उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित,संजयभाऊ जाधव,संजयभाऊ दाभाडे,सचिनभाऊ आरते,विनोद भेगडे,गणेश आप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.पंढरीनाथ पारगे,श्री.तानाजी पारगे,जयंत कदम,आघाडी अध्यक्ष श्री.संतोष परदेशी,
उपाध्यक्षा पल्लवीताई गवारे,सरचिटणीस मीनाताई भेगडे,किर्तीताई लोणकर,उपाध्यक्षा संज्योगीता आगळे,सचिव रुपालीताई भेगडे,आशाताई रायरीकर,मंगलताई भेगडे,मालतीताई म्हाळसकर,युवती सरचिटणीस साक्षीताई ठाकुर,सोशल मिडिया अध्यक्ष गौरव शहा,अनु.जाती मोर्चा कार्याध्यक्ष श्री.संदीप चव्हाण,ओ.बी. सी.मोर्चा  अध्यक्ष श्री नितीनजी पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागरजी शर्मा,विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष मयुर भोकरे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक,पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे,प्रसिद्धीप्रमुख महेश सोनपावले,भाजयुमो संघटनमंत्री केदार भेगडे,सरचिटणीस निखिल म्हाळसकर,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष श्री.अरुण शुक्ला,रामभाऊ माने,सचिन घारे,आदेश जाधव,विशाल जव्हेरी,मयुर पाठारे,राहुल पाठारे,उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या