तळेगाव शहरातील केदार भेगडे युवा मंचच्या वतीने भव्य प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणावर आयोजित केलेली असून या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वा. मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेचे औचित्य साधून केदार भेगडे युवा मंच च्या वतीने अयोध्या येथे साकारत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या भव्य मंदिर निर्माणकरता ११००० रुपयांचा धनादेश संतोष दाभाडे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, मा नगराध्यक्ष रवींद्र नाना दाभाडे, युवाध्यक्ष संदीप काकडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, मा संतोष दाभाडे पाटील, गटनेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, अरुण भगवान भेगडे, निखिल भगत, मा श्रीराम कुबेर, दिपक भेगडे, मा संदीप भेगडे, विनोद बंटी भेगडे, बाळाभाऊ भेगडे स्नेह ग्रुप, सर्व खेळाडू, प्रेक्षक आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या