वडगाव - आंबी- वारंगवाडी ग्रामपंचायत सदस्य पदी ता सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सर्व ग्रामस्थ यांनी एक मताने निवड करून तालुक्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे.
मावळ तालुका भारतीय जनता पार्टी महीला आघाडीत सरचिटणीस अशी तालुक्यात त्याच्यावर पक्षाची जबाबदारी आहे.राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या माध्यमातून त्यानी अनेक स्त्रियांना,ज्येष्ठ नागरिकांना,दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजनेतून पेशन्सचा लाभ मिळवून दिला आहे.तसेच महिलांना फॅशन डिझायनर कोर्सचे प्रशिक्षण आणि विविध उपक्रम राबवून सक्षम करण्याचं त्यानी कार्य केलं आहे.बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षाव होत आहे.येवलेवाडी येथील उद्योजक सोपान येवले, गणेश चिखले,संतोष अभंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या